तुम्हाला हा प्रश्न पडला आहे का ? दहावी आणि बारावीनंतर पुढे काय करायचं? हा आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. तर तो निर्णय सुद्धा योग्यच असायला हवा. काळजी करू नका , आपण बघूया करिअरची दिशा ठरवणारे विविध पर्याय आणि त्यांची माहिती खालील प्रमाणे आहे. दहावी आणि बारावीनंतर कोणते करिअर पर्याय उपलब्ध आहेत, आणि त्यातून आपला मार्ग कसा निवडता येईल, हे आपण आता बघूया !
दहावी नंतर चे करिअर पर्याय?
दहावीनंतर तुम्ही वाणिज्य, विज्ञान आणि कला या क्षेत्रात अकरावी आणि बारावी करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा सुद्धा करू शकता. तर मग तुम्ही कसं ठरवाल की तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा हे सोप्पं आहे. जर तुम्हाला
वाणिज्य म्हणजेच कॉमर्समध्ये जाण्याची इच्छा असेल, तर त्यात अकाउंट म्हणजे एखाद्या व्यवसायाचा जमा खर्च एवढेच नसून त्यात अजून खूप करिअर पर्याय उपलब्ध आहेत. त्यात तुम्ही कंपनी सचिव (Company Secretary), चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant), अॅक्चुअरी (Actuary), वित्त विश्लेषक (Financial Analyst), गुंतवणूक बँकिंग (Investment Banking), लेखापाल (Accountant), बँकर (Banker), खर्च लेखापाल (Cost Accountancy), मानव संसाधन (Human Resources – HR), व्यवस्थापन लेखापाल (Management Accountant), विपणन (Marketing), डिजिटल विपणन (Digital Marketing), उद्योजकता (Entrepreneurship), कायदा (LLB – Bachelor of Laws), व्यवस्थापन (Management), विमा प्रतिनिधी (Insurance Agent), शेअर व्यापारी (Stock Trader), कर सल्लागार (Tax Advisor), वाणिज्य पदवी (Bachelor of Commerce – B.Com), लेखापरीक्षक (Auditor), व्यवसाय प्रशासन पदवी (Bachelor of Business Administration – BBA), व्यवसाय सल्लागार (Business Consultant), ई-कॉमर्स व्यवस्थापन (E-Commerce Management), अर्थतज्ज्ञ (Economist), असे अनेक पर्याय आहेत.
कला (Arts) क्षेत्रात पण खूप गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. जसे की फॅशन डिझायनर (Fashion Designer), सोशल वर्कर (Social Worker), ग्राफिक डिझायनर (Graphic Designer), इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management), बी.ए. इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन (BA in Journalism and Mass Communication), डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing), हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट (Hospitality Management), हॉटेल मॅनेजर (Hotel Manager), फोटोग्राफर (Photographer), अॅनिमेशन (Animation), बॅचलर ऑफ आर्ट्स (Bachelor of Arts), बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (Bachelor of Business Administration), फिल्ममेकर (Filmmaker), जर्नालिस्ट (Journalist), लॉ (Law), इंटीरियर डिझायनर (Interior Designer), इंटिग्रेटेड लॉ (Integrated Law), बॅचलर ऑफ लॉज (Bachelor of Laws), बी.एस्सी. इन डिझाईन (BSc in Design), मीडिया अँड कम्युनिकेशन (Media and Communication), सायकोलॉजी (Psychology), बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन (Bachelor of Fashion Design), वेबसाईट कंटेंट रायटर (Website Content Writer), एडिटर (Editor).
विज्ञान (Science) क्षेत्रात तुम्ही पुढील पर्याय उपलब्ध आहेत, जसे की बायोटेक्नॉलॉजी (Biotechnology), इंजिनिअरिंग (Engineering), बॅचलर ऑफ फार्मसी (Bachelor of Pharmacy), फॉरेन्सिक सायन्स (Forensic Science), बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery), बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग (Bachelor of Science in Nursing), सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering), एन्व्हायर्नमेंटल सायन्स (Environmental Science), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन (Bachelor of Computer Application – BCA), डेंटल डिग्री (Dental Degree), खगोलशास्त्रज्ञ (Astronomer), बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (Bachelor of Architecture), डेटा सायन्स (Data Science), मशीन लर्निंग इंजिनिअर (Machine Learning Engineer), रिसर्च सायंटिस्ट (Research Scientist), आर्किटेक्चर (Architecture), बॅचलर ऑफ सायन्स (Bachelor of Science), कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग (Computer Science Engineering), फार्मासिस्ट (Pharmacist), बीटेक फूड टेक्नॉलॉजी (BTech Food Technology), सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer), एरोनॉटिकल इंजिनिअर (Aeronautical Engineer), बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (Bachelor of Business Administration – BBA), बायोमेडिकल इंजिनिअर (Biomedical Engineer).
बारावी नंतर चे करिअर पर्याय
दहावीमध्ये जर तुम्ही तुमच्या आवडीचे करिअर निवडले होते किंवा जे तुम्ही निवडले होते त्यामध्ये गोडी निर्माण झाली असेल, तर बारावीचा निर्णय घेणे सोपे जाईल. परंतु तुम्ही ह्या टप्प्यात असाल आणि तुम्ही दहावीला घातलेला निर्णय योग्य नव्हता, असे तुम्हाला या क्षणाला वाटत असेल, तर हा दुसरा पर्याय आहे, जिथे तुम्ही तुमची चूक सुधारू शकता. म्हणजेच करिअर परत बदलू शकता. हे शक्यतो करू नये. दहावीला योग्य निर्णय घ्यावा, परंतु खूप लोक चुकीचा निर्णय घेतात, त्यांना कुठं जायचं काय करायचं माहित नसतं, मग ते इथून तिथं, तिथून इथे फिरत बसतात. आणि या गोंधळात चुकीचे निर्णय घेतात. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जे कराल, ते तन, मन, धन लावून करा.
यात वर सांगितल्याप्रमाणे,
विज्ञान शाखा (Science):
यामध्ये अभियांत्रिकी (B.E / B.Tech), वैद्यकीय शिक्षण (MBBS, BAMS, BHMS, Nursing), बी.एस्सी. (B.Sc – Computer Science, Biotechnology, Physics इ.), तसेच डेटा सायन्स / कृत्रिम बुद्धिमत्ता / सायबर सुरक्षा (Data Science / Artificial Intelligence / Cyber Security) यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट करिअर करता येऊ शकते.
वाणिज्य शाखा (Commerce):
वाणिज्य शाखा निवडणाऱ्यासाठी बी.कॉम. (B.Com), चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), कंपनी सेक्रेटरी (CS), बिझनेस मॅनेजमेंट (BBA / MBA) आणि डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) हे लोकप्रिय आणि करिअर वाढीसाठी उपयुक्त पर्याय आहेत.
कला शाखा (Arts):
कला शाखेतील विद्यार्थ्यांना सर्जनशील आणि समाजाभिमुख क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याची संधी मिळते. यामध्ये बी.ए. (BA – Psychology, Sociology, Political Science इ.), पत्रकारिता / जनसंवाद (Journalism / Mass Communication), तसेच फॅशन / इंटेरियर / इव्हेंट मॅनेजमेंट (Fashion / Interior / Event Management) यांसारख्या क्षेत्रांमध्ये उज्ज्वल करिअर घडवता येते.
नवीन जे आता आणि भविष्यत झपाटयाने वाढत आहे ते करिअर पर्याय खालील प्रमाणे आहेत:
वेब विकास / ॲप विकास (Web / App Development),
यूआय-यूएक्स डिझाईन (UI-UX Design),
ब्लॉगिंग / यूट्यूब / इन्फ्लुएंसर मार्केटिंग (Blogging / YouTube / Influencer Marketing),
लेखन (Content Writing),
डेटा विश्लेषण आणि क्लाऊड तंत्रज्ञान (Data Analytics / Cloud Technology).
निष्कर्ष
१० वी किंवा १२ वी नंतरचा निर्णय हा फक्त “पुढे काय शिकायचं” एवढाच नसतो, तर “आपली आवड, क्षमता आणि स्वप्नं ओळखून योग्य दिशा निवडायची” गोष्ट असते.
स्वतःवर विश्वास ठेवा, नवीन गोष्टी शिकत रहा आणि सातत्य ठेवा. यश एका दिवसात मिळत नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय मिळतही नाही.
जर तुम्हाला नोकरीपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असेल, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करा, उद्योजक बना, आणि आपल्या कल्पनांना वास्तवात आणा.
तुझ्यात जर आत्मबल आणि आत्मविश्वास असेल, तर तुला मरण नाही. स्वतःवर विश्वास ठेव, कारण तुझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारा पहिला तू स्वतः हो, मग ती पूर्ण होतीलचं.