चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशोत्सव मंडळांना मिळालेल्या कॉर्पोरेट प्रायोजकत्वावरून चर्चा सुरू झाली आहे नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार चिंचपोकळीचा चिंतामणीला अदानीचा जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळासोबत करार झाला आहे. गेल्या वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंडपस्थळापासून आसपासच्या परिसरात रिलायन्स पुरस्कृत जाहिरातींनी ‘अनंत’मय केल्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘लालबागच्या राजा’च्या मंडळात अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’च्या सार्वजनिक उत्सव मंडळाने अदानी ग्रुपला आपलेसे केले आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या पडद्यावर अदानींचे नाव
आपण पहिले असेल आगमन जेव्हा होते तेव्हा पडद्यावर अदानींचे नाव मोठया अक्षरात होते व मंडळाचे नाव वरती आणि खाली अदानींचे नाव होते. यंदा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे वर्गणीदार आणि प्रवेशद्वार आणि मोक्याच्या जागी अंदानी समुहाच्या जाहिराती झळकणार आहेत. अदानी समूहाच्या करारामुळे मंडप आणि उत्सवाच्या परिसरातील LED स्क्रीन, बॅनर आणि पोस्टर्सवर अदानी समूहाच्या ब्रँडिंगला स्थान मिळणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पारंपरिक गणेशोत्सवाच्या वातावरणात कॉर्पोरेट ब्रँडिंग अधिक ठळकपणे दिसणार आहे. याबाबत चर्चा सुरू झाली आहे
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या पारंपरिक व्यवसायाला फटका?
मोठ्या कॉर्पोरेट प्रायोजकामुळे उत्सवाला आर्थिक बळ मिळणार असले, तरी स्थानिक पारंपरिक व्यवसाय आणि छोट्या व्यावसायिकांच्या सहभागावर त्याचा परिणाम होणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. मंडळाला मिळणाऱ्या आर्थिक पाठबळामुळे उत्सव अधिक भव्य होऊ शकतो. मात्र त्याचवेळी स्थानिक आणि पारंपरिक व्यावसायिकांना जाहिरात व ब्रँडिंगच्या वाढत्या प्रभावाचा किती फायदा किंवा तोटा होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे मोठ्या प्रायोजकामुळे मंडळाला आर्थिक बळ मिळून उत्सव अधिक भव्य पद्धतीने आयोजित करता येऊ शकतो, तर दुसरीकडे पारंपरिक जाहिरातदारांचे स्थान आणि सहभाग कायम राहणार का, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो.
चिंचपोकळीच्या चिंतामणीसोबत अदानी समूहाचा जाहिरात करार; मंडळाच्या कारभारात मात्र हस्तक्षेप नाही
दरवर्षी गणेशोत्सवाचा काळ जवळ येताच विविध कंपन्यांकडून गणेश मंडळांना जाहिरातीसाठी संपर्क केला जातो. यंदा अदानी समूहानेही चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाशी संपर्क साधला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या करारानुसार अदानी समूहाच्या उत्पादनांच्या जाहिराती मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
मात्र, अदानी समूहाची भूमिका केवळ जाहिरातदार म्हणूनच असणार आहे. यापलीकडे समूहाचा मंडळाच्या कामकाजाशी कोणताही संबंध नसल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मंडळाचा कारभार ठरावीक नियमांनुसार चालतो आणि दरवर्षी त्याच्या कार्यकारिणीवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. अदानी समूहातील कोणत्याही व्यक्तीला मंडळाच्या कार्यकारिणीत किंवा मंडळाच्या व्यवस्थापनात स्थान दिले जाणार नसल्याचे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव संतोष सोहनी यांनी सांगितले.

